गोवा सरकार जीएसआयडीसीला भांडवली योगदानाव्यतिरिक्त हाती घेतलेल्या प्रकल्पांच्या निधीसाठी योगदान देते. प्रकल्प विकासादरम्यान सुरुवातीला BOOT/BOLT/BOO च्या माध्यमातून प्रकल्पाला निधी देण्याच्या शक्यतेचे मूल्यमापन केले जाते. ते शक्य नसल्यास भारत सरकारच्या सहाय्याने या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्याची शक्यता तपासली जाते. शेवटी, वरील गोष्टी शक्य नसल्यास स्वनिधीतून प्रकल्प हाती घेतले जातात.त्यानंतर मुदतकर्जाच्या माध्यमातून प्रकल्पांना निधी देण्याचा शेवटचा पर्याय निवडला जातो. गोवा सरकारने अर्थसंकल्पात जीएसआयडीसीच्या प्रकल्पांसाठी निधीची तरतूद केली आहे आणि बहुतेक प्रकल्पांना त्याद्वारे निधी मिळू शकेल अशी अपेक्षा आहे.
अस्वीकरण: राजभाषा संचालनालय, गोवा सरकार द्वारे अनुवादित. टीप: कोणत्याही परिस्थितीत कायदेशीर अर्थाविष्कारासाठी, इंग्रजी आवृत्तीला प्राधान्य दिले जाईल.