जीएसआयडीसीमधील काम
इतर राज्यांतील (उदा. महाराष्ट्रातील एमएसआरडीसी) अशाच महामंडळांच्या धर्तीवर राज्यभरात रस्ते, पूल, उड्डाणपूल, वाहतूक व्यवस्थापन, बसस्थानके, पाणी पुरवठा वाढवणे, इस्पितळे, पर्यटनाशी संबंधित प्रकल्प, इ. सारख्या सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीसाठी गोवा सरकारतर्फे विशेष उद्देश संस्था म्हणून जीएसआयडीसीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण गोवा राज्यात पायाभूत सुविधांचा विकास होण्यास मदत होईल. हे महामंडळ सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी समन्वयक अभिकरण म्हणून काम करेल.
गेल्या काही वर्षांत, महामंडळाने वाढत्या प्रमाणाची व जटिल अभियांत्रिकी व बांधकामाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत.
आमचे कर्मचारी आव्हानात्मक कामांवर काम करण्यास उत्सुक असतात ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात शिकता येते आणि त्यांच्या ज्ञानात भर पडते, परिणामी याचा त्यांना करिअरमध्ये लाभ होतो.
- कर्मचार्यांची संख्या 100
- पूर्ण केलेले प्रकल्प 500+
- सरकारकडून बक्षिसे -
कर्मचारी अभिप्राय
महाव्यवस्थापक (सिव्हिल) - I
2006 पासून जीएसआयडीसीबरोबर काम करत आहे
मला जीएसआयडीसीमध्ये काम करण्याची संधी मिळाली तेव्हा माझ्यासाठी तो सुखद धक्काच होता, ज्यामध्ये स्टार्ट-अप आणि परिपक्व सुव्यवस्था यांचा मेळ दिसून येतो. सरकारी संस्थेतील हा दुर्मिळ संगम त्याला अत्याधुनिक व उच्च दर्जाचे बनवितो, ज्यामुळे ते विशेषत: गोव्यातील आणि व्यापक स्तरावर देशातील साधनसुविधा प्रदात्यांच्या बरोबरीने चालणारी एक चपळ संस्था बनते. जीएसआयडीसीमधील 13 वर्षे (2006 मध्ये रुजू) कशी गेली हे मला समजलेच नाही.
माझा दावा आहे की, अशी इतर कोणतीही संस्था नाही जेथे एखाद्याला पायाभूत सुविधा व त्यापलीकडील विविध गोष्टींची माहिती व अनुभव मिळू शकेल. शिकाऊ व्यक्तीला जीएसआयडीसीमध्ये खूप काही शिकण्यासारखे आहे कारण वेळेनुसार तुम्हाला नवीन आव्हानांना व समस्यांना सामोरे जाण्याची संधी मिळते. निर्धारित वेळेत दर्जात्मक काम करण्याचा असलेला ताण आणि ते साध्य झाल्यावर मिळणारे समाधान ही माझ्यासाठी मोठी प्राप्ती असते.
होय, प्रस्ताव, संवाद, सादरीकरण, बैठका, कामाची ठिकाणे व उद्घाटन समारंभ या सर्व उपक्रमांचे हे एक केंद्र आहे. उत्तमरित्या सुरळीत चालणार्या एखाद्या मशीनप्रमाणे सर्व काही चांगल्या प्रकारे चालते. मला पुन्हा एकदा खात्री आहे की, माझी संस्था सतत अग्रेसर राहील आणि राज्याला उत्तम सेवा देऊन सर्वांमध्ये लक्षवेधी ठरेल.
व्यवस्थापक (आयटी)
2002 पासून जीएसआयडीसीबरोबर काम करत आहे
जीएसआयडीसीमध्ये 2002 मध्ये नोकरी स्वीकारणे, हा माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम निर्णयांपैकी एक आहे. मी ऐकले होते की, जीएसआयडीसी ही सरकारी कंपनी असूनही काम करण्यासाठी एक उत्तम स्थान आहे आणि येथे खासगी कंपन्यांसारखीच एक उत्कृष्ट कार्यसंस्कृती आहे, मी हे पद स्वीकारण्याचे हे एक मुख्य कारण होते. मी कंपनीला दिलेल्या विशेष अनुभवांसाठी एक व्यक्ती आणि एक कर्मचारी म्हणून मौल्यवान आहे, हे समजल्यानंतर मला आनंद झाला.
कंपनीच्या यशात विशेषत: राज्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधांच्या विकासात मी वैयक्तिकरित्या योगदान देत आहे, ज्यामुळे गोव्यातील लोकांच्या जीवनाचा दर्जा उंचावत आहे, हे जाणून खूप आनंद होत आहे. सहकार्यात्मक निर्णय कसे घेतले जातात आणि माझे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यामध्ये माझेही मत घेतले जाते, हे मला सर्वात जास्त भावते. यामुळे मला मालकीची भावना प्राप्त होते आणि यामुळे माझा कामाचा दिवस अधिक आनंददायक आणि आव्हानात्मक बनतो. वरिष्ठांनी नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि मला वाटते की, मी माझे सर्वोत्तम देऊन तो विश्वास सार्थ ठरविला आहे. मी बुद्धिमान व उत्साही व्यक्तींच्या अप्रतिम टीमसोबत काम करत आहे हे नमूद करताना मला खूप आनंद होत आहे.
उप व्यवस्थापक (वित्त)
Jul 2004 पासून जीएसआयडीसीबरोबर काम करत आहे
गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामध्ये रुजू होणे हा माझ्या कारकिर्दीताल सर्वोत्तम निर्णयांपैकी एक होता. या संस्थेसाठी उप व्यवस्थापक (वित्त) म्हणून काम करणे हा माझ्यासाठी आनंददायी अनुभव आहे. एक व्यक्ती म्हणून आणि कंपनीचा एक कर्मचारी म्हणून मी मौल्यवान आहे, हे जाणणे आनंदाचे वाटते. कंपनीच्या यशात मी वैयक्तिकरित्या योगदान देत आहे याचा मला अभिमान वाटतो. जीएसआयडीसीमध्ये काम करणार्या प्रत्येक विविध व्यक्तींशी संवाद साधणेही मला आवडते. माझे काम आनंददायी आहे, आव्हानात्मक आहे, आणि मी बुद्धिमान व उत्साही व्यक्तींच्या टीमसोबत काम करत आहे.
सहायक व्यवस्थापक (सिव्हिल)
2008 पासून जीएसआयडीसीबरोबर काम करत आहे
जून 2008 मध्ये या प्रतिष्ठित कार्यालयात माझ्या वर्गातील तीन सहकार्यांसमवेत एक प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होण्याची संधी मला मिळाली. सुमारे शंभर कोटी रुपये किंमतीच्या भव्य प्रकल्पाशी जुळण्याचे भाग्य आम्हाला लवकरच लाभले. या सार्वजनिक प्रकल्पांमुळे विविध कंत्राटदार, सल्लागार, सेवार्थी खाती यांच्याशी माझे संबंध वृद्धिंगत करण्यास आणि माझ्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना आज्ञाधारकपणे हाताळण्यास मला मदत झाली. येथील 7 वर्षांच्या काळात मिळालेल्या मौल्यवान अनुभवामुळे मी एक मेहनती, अधिक परिपक्व व जबाबदार व्यक्ती बनलो आहे. या गुणांमुळे, मी हाताळणार्या कामानुसार येणार्या कोणत्याही परिस्थितीकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन विकसित करण्यास मला मदत झाली आहे. माझ्या जीवनाच्या भावी वाटचालीत इतरत्र हा अनुभव मी कायम जपणार आहे.
सहायक व्यवस्थापक (सिव्हिल)
June 2014 पासून जीएसआयडीसीबरोबर काम करत आहे
महाविद्यालयातून प्रशिक्षण घेत असताना, जीएसआयडीसीने हाती घेतलेल्या प्रकल्पासाठी, मी सल्लागार प्रतिनिधी म्हणून काम करत असताना, मला या संस्थेबद्दल समजले. तेव्हापासून, जीएसआयडीसीसारख्या कार्यालयीन वातावरणात काम करताना कसे वाटते, याचा अनुभव मला नेहमीच घ्यायचा होता. कँपस मुलाखतीद्वारे जीएसआयडीसीमध्ये रुजू होण्याची संधी मला मिळाली. मी, संस्थेच्या विविध विभागांतील विस्तृत कर्मचारीवर्गासोबत आणि फक्त गोव्यातीलच नव्हे तर गोव्याबाहेरील कंत्राटदारांसोबत व सल्लागारांसोबत काम करत असल्याने माझे संवाद व नेटवर्किंग कौशल्यही विकसित झाले. यामुळे प्रकल्प हाताळताना मला विविध सरकारी खात्यांशीही संवाद साधता आला आहे. एकंदरीत येथील वातावरण चांगले आहे; प्रत्येकजण तुमच्या विचारांना महत्त्व देतात आणि वरिष्ठांकडून चांगले ज्ञान प्राप्त करता येते.