गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित ही गोवा सरकारची पूर्ण मालकीची सरकारी कंपनी आहे जी कंपनी अधिनियम, 1956 अन्वये कंपनी निबंधक, पणजी-गोवा येथे नोंदणीकृत आहे. कंपनी निबंधकातर्फे दिनांक 20/02/2001 रोजी संस्थापन प्रमाणपत्र क्र. U75112GA2001SGC002954 (सीआयएन) देण्यात आले आहे. कंपनीला त्यांच्या निधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गोवा सरकार राज्याच्या अर्थसंकल्पात भागभांडवलासाठी/योगदानासाठी तरतूद करते.
कंपनीची भांडवली रचना अशी आहे:
1. अधिकृत भांडवल : रु.5,00,00,000.00
2. अभिदत्त भांडवल : रु. 3,10,00,660.00
3. भरणा झालेले भांडवल : रु 3,10,00,060.00
व्यवसाय
इतर राज्यांतील (उदा. महाराष्ट्रातील एमएसआरडीसी) अशाच महामंडळांच्या धर्तीवर राज्यभरात रस्ते, पूल, उड्डाणपूल, वाहतूक व्यवस्थापन, बसस्थानके, पाणी पुरवठा वाढवणे, इस्पितळे, पर्यटनाशी संबंधित प्रकल्प, इ. सारख्या सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीसाठी गोवा सरकारतर्फे विशेष उद्देश संस्था म्हणून जीएसआयडीसीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण गोवा राज्यात पायाभूत सुविधांचा विकास होण्यास मदत होईल. हे महामंडळ सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी समन्वयक अभिकरण म्हणून काम करेल.
कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय :-
गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित
7वा व 8वा मजला, ईडीसी हाऊस,
डॉ. आत्माराम बोरकर मार्ग,
पणजी, गोवा 403 001, येथे आहे.
दूरध्वनी : 91-832-2493550
फॅक्स : 91-832-2493577
ईमेल :