• कनेक्टिव्हिटी

    आम्ही गोमंतकीयांना

    30+ पूल | 40 रस्ते | 7 बस स्थानकांच्या जाळ्याने एकमेकांशी जोडतो

  • आरोग्य सुविधा

    आम्ही दररोज

    20+ इस्पितळांसह जीवनदान देतो

  • सार्वजनिक सुविधा

    आम्ही लोकांना

    30+ प्रशासकीय इमारती | 15+ सामाजिक पायाभूत सुविधांसह अधिक चांगल्या दर्जाचे जीवन देतो

  • क्रीडा व शिक्षण

    आम्ही 600+ शाळा, 5+ महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांना केवळ

    शिकण्यासच नव्हे तर खेळण्यास देखील मदत करतो

  • इतर पायाभूत सुविधा

जीएसआयडीसी विषयी

गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित

ही गोवा सरकारची पूर्ण मालकीची सरकारी कंपनी आहे जी कंपनी अधिनियम, 1956 अन्वये कंपनी निबंधक, पणजी-गोवा येथे नोंदणीकृत आहे. कंपनी निबंधकातर्फे दिनांक 20/02/2001 रोजी संस्थापन प्रमाणपत्र क्र. U75112GA2001SGC002954 (सीआयएन) देण्यात आले आहे. कंपनीला त्यांच्या निधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गोवा सरकार राज्याच्या अर्थसंकल्पात भागभांडवलासाठी/योगदानासाठी तरतूद करते.

इतर राज्यांतील (उदा. महाराष्ट्रातील एमएसआरडीसी) अशाच महामंडळांच्या धर्तीवर राज्यभरात रस्ते, पूल, उड्डाणपूल, वाहतूक व्यवस्थापन, बसस्थानके, पाणी पुरवठा वाढवणे, इस्पितळे, पर्यटनाशी संबंधित प्रकल्प, इ. सारख्या सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीसाठी गोवा सरकारतर्फे विशेष उद्देश संस्था म्हणून जीएसआयडीसीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण गोवा राज्यात पायाभूत सुविधांचा विकास होण्यास मदत होईल. हे महामंडळ सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी समन्वयक अभिकरण म्हणून काम करेल.

आमच्या ताज्या बातम्या बघा...

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 महिन्यासाठी आधारभूत किंमत.

पुढे वाचा »

एप्रिल, मे आणि जून 2024 महिन्यासाठी आधारभूत किंमत.

पुढे वाचा »

जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2024 महिन्यासाठी आधारभूत किंमत.

पुढे वाचा »
सर्व पहा »
  • कनेक्टिव्हिटी

    अटल स

    अटल सेतू हा पणजी ते पर्वरीला जोडणारा एकूण 5.13 कि.मी. लांबीचा केबल स्टेड पूल आहे, ज्यामुळे विद्यमान दोन पूल, सर्कल आणि जंक्शन यांवरील वाहतूक कोंडी कमी होते व एकूण प्रवासाची वेळ 3.5 मि. पर्यंत कमी होते.

    साखळी

    साखळी बसस्थानकाची रचना ही स्वतंत्र प्रवेश व निर्गम मार्गांसह करण्यात आली असून प्रवेशद्वारावर रिक्षा स्टँड आहे. दिव्यांग व्यक्तींना अडथळामुक्त वातावरण मिळावे यासाठी वाहतुकीशी संबंधित सर्व सार्वजनिक सुविधा तळमजल्यावर ठेवण्यात आल्या आहेत.

    हा पू

    हा पूल रुआ द ओरेम मार्गाला पाटो कॉम्प्लेक्सशी जोडतो आणि यामुळे कदंब बसस्थानक, बहुस्तरीय कार पार्किंग आणि पाटो पूल भागात प्रवेश करणार्‍या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

  • आरोग्य सुविधा

    दक्षि

    दक्षिण गोव्यातील हॉस्पिसिओ इस्पितळाची दुरवस्था झाली होती आणि दक्षिण गोव्यातील भागात परवडणारी व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध नव्हती. नवीन दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातर्फे, दक्षिण गोव्यातील रहिवाशांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा दिली जाते, ज्यामुळे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय व इस्पितळ यावरील भार कमी होतो.

    सध्या

    सध्याच्या जुन्या ग्रामीण आरोग्य केंद्राची आणि वसतिगृहाची इमारत अत्यंत वाईट अवस्थेत होती आणि त्यामुळे ते पाडून मंडूर, आझोशी, नेवरा आणि शेजारील गावांना चांगल्या आरोग्य गरजा पुरवण्यासाठी मंडूर, गोवा येथे 20 खाटांचे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृह बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

    बीडीए

    बीडीएस अभ्यासक्रमांत व पदव्युत्तर अभ्यासक्रमांत वाढ झाल्याने ती पूर्ण करण्यासाठी दंत महाविद्यालय व इस्पितळ याचा दुसरा टप्पा हाती घेण्यात आला. या महाविद्यालयातर्फे भारतीय दंत परिषदेच्या गरजा पूर्ण केल्या जातात आणि विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रशिक्षण सुविधा दिल्या जातात तसेच लोकांच्या, आर्थिक आवाक्याबाहेर असलेल्या गरजा पूर्ण केल्या जातात.

  • सार्वजनिक सुविधा

    पोर्त

    पोर्तुगीज काळातील बाजारपेठांपैकी एक असलेला जुना बाणस्तारी बाजार, हा गणेश चतुर्थी उत्सवात केल्या जाणार्‍या “माटोळी” या परंपरेसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या फुलांसाठी व फळांसाठी ओळखला जातो. गणेश चतुर्थीच्या व्यस्त खरेदीबरोबरच या बाजारातून आजूबाजूच्या गावांना दररोज भाजीपाला, फळे व मासे मिळतात. गुरुवारी व शुक्रवारी आजूबाजूचे बरेच लोक या बाजारात गर्दी करतात. नवीन बाणस्तारी बाजार संकुलातर्फे परिसरातील वाढत्या गरजांनुसार विद्यमान सर्व दुकानदारांना व व्यापार्‍यांना चांगल्या सुविधा व सोयीसह जागा उपलब्ध करून दिल्या आहेत, आणि आर्थिक व्यवहार्यतेसाठी आणखी दुकानांची भर घालण्यात आली आहे.

    साखळी

    साखळी येथील रवींद्र भवन हे 800 आसनक्षमतेचे अत्याधुनिक सभागृह असून त्यात आधुनिक ऑडिओ, व्हिडीओ देण्यात आला आहे ज्याचा उपयोग कला, चित्रपट आणि स्टेज शोसाठी केला जाऊ शकतो याशिवाय मुख्य सभागृहाशेजारी खुले थिएटरदेखील बांधण्यात आले आहे.

    मांडव

    मांडवी नदीकाठच्या किनारपट्टीचे अत्याधुनिक विहारपथाच्या माध्यमातून पुनरुज्जीवन व संरक्षण केले आहे. सर्व वयोगटातील नागरिकांसाठी उत्साही वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यमान उपक्रमांमध्ये सुधारणा, नवीन उपक्रम आणि किनारपट्टीचे संरक्षण केले आहे. पथदिव्यांचे खांब व सजावटीची रोषणाई प्रदान करण्यात आली आहे.

  • क्रीडा व शिक्षण

    "छत्रपती शिवाजी महाराज सरकारी शाळा संकुल, डिचोली- गोवा” हा भविष्यासाठी शाळा बांधण्यासाठीचा प्रयत्न आहे. शालेय कामकाजात बदल घडवून आणणे आणि 21व्या शतकासाठी इमारत विकसित करण्यासाठीची ही एक उपलब्धी आहे. शाळेची इमारत डिचोली-गोवा येथे स्थित आहे.

    क्रीड

    क्रीडा संकुले विकसित करून गोव्यातील युवकांमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी जीएसआयडीसी मोठी भूमिका बजावत आहे. केपे तालुक्यातील लोकांना क्रीडा व करमणुकीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला.

    दर्जा

    दर्जात्मक संशोधन सुविधेसाठी आणि एक उत्कृष्ट, आधुनिक संशोधन सुविधा तयार करण्यासाठी, विज्ञान अध्ययनाचा समावेश करण्याकरिता आवाराच्या विस्ताराची वाढती गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने विज्ञान शाखा इमारतीची संकल्पना ठेवण्यात आली आहे.

  • इतर पायाभूत सुविधा

    साळगा

    साळगाव येथील घनकचरा व्यवस्थापन ही वर्गीकरण, पुनर्वापरयोग्य वस्तूंची पुनर्प्राप्ती आणि बायो-मिथेनेशन तंत्रज्ञानासह यांत्रिक जैविक अभिक्रिया प्रक्रियेवर आधारित महापालिकेच्या घनकचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक सुविधा आहे. प्रकल्पात बायो-मिथेनेशन प्रक्रियेद्वारे उत्पादित केलेल्या गॅसपासून वीज निर्मिती केली जाते जी प्रकल्पाच्या प्रचालनासाठी वापरली जाते आणि उत्पादित अतिरिक्त वीज, ग्रीडला पुरविली जाते.

    पेन्ह

    पेन्हा-द-फ्रान्स येथील नवीन उच्च न्यायालयाच्या इमारतीची रचना, शाश्वत तंत्रज्ञानांच्या व पद्धतींच्या तत्त्वांशी सुसंगत अशी करण्यात आली आहे आणि क्रॉस व्हेंटिलेशन व प्रकाश, पाणी व स्थानिक सामग्री यासारख्या नैसर्गिक संसाधनांच्या इष्टतम वापरासाठी पारंपरिक गोव्याच्या स्थापत्यशास्त्रासह सर्वात प्रगत उपयुक्त अभियांत्रिकी तंत्रांची सांगड घालण्यात आली आहे.

    1945 साल

    1945 साली स्थापन झालेल्या म्हापसा येथील प्रतिष्ठित आझिलो इस्पितळाची वारसा इमारत जीर्ण अवस्थेत होती. जीएसआयडीसीने ती जुनी वास्तू यशस्वीरित्या पुनर्संचयित केली आणि पुनर्युवीकृत दर्शनी भाग, विंटेज रोषणाई आणि सुखदायक जागेसह एक मजबूत वारसा इमारत प्रदान केली ज्यामुळे पूर्वीच्या काळातील वातावरण अबाधित राहिले.

preloader
  • 150yrs of Celebrating Mahatma Gandhi
  • Digital India
  • Government Of Goa
  • Incredible India
  • NationalPortal India gov
अस्वीकरण: राजभाषा संचालनालय, गोवा सरकार द्वारे अनुवादित. टीप: कोणत्याही परिस्थितीत कायदेशीर अर्थाविष्कारासाठी, इंग्रजी आवृत्तीला प्राधान्य दिले जाईल.